AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election 2026 :  ठाण्याच्या मानपाडा मतमोजणी केंद्रावर EVM वरून राडा, मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवारांमध्ये गदारोळ

Maharashtra Election 2026 : ठाण्याच्या मानपाडा मतमोजणी केंद्रावर EVM वरून राडा, मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवारांमध्ये गदारोळ

| Updated on: Jan 16, 2026 | 10:08 AM
Share

ठाण्याच्या मानपाडा येथील मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीनच्या वादामुळे मोठा राडा झाला. शिंदेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार यांच्यात हा प्रकार घडला. ईव्हीएम सील उघडल्याचा आणि बोगस मतदानाचा आरोप अपक्ष समर्थकांनी केला. भूषण मोघेंवर मिरची पूड फेकल्याचा दावाही करण्यात आला.

ठाण्याच्या मानपाडा येथील मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीनच्या संशयावरून मोठा गदारोळ झाला. शिवसेनेच्या (शिंदे गट) मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हा वाद झाल्याचे वृत्त आहे. मतमोजणी केंद्रातून ईव्हीएम मशीन घेऊन जात असताना बसेस अडवण्यात आल्या. मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी केंद्रावर गर्दी केली होती. अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी आरोप केला की, सील केलेली ईव्हीएम मशीन पुन्हा उघडण्यात आली आणि बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. भूषण मोघे नामक अपक्ष समर्थकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. यामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती, आणि पोलीस गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करत होते.

Published on: Jan 16, 2026 10:08 AM