Donald Trump Video : जग भले जावो कोमात, डोनाल्ड ट्रम्प मात्र जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सूत्र हाती घेताच आपल्या धोरणांनी जगाच्या भूवया उचलल्यात. जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडली. अमेरिकेत आता फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच लिंगांना मान्यता असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकारही ट्रम्प सरकारने संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय.
महासत्ता अमेरिकेची सत्ता हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिग्स देशांना धमकी देत घेतलेल्या धोरणांचा फटका भारतीयांना देखील बसू शकतो. अमेरिका पतनाची वेळ संपवून नव्या युगाची सुरूवात झाली असं म्हणत ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी डान्स करत केक कापला. अध्यक्षपदाच्या शपथेनंतर काहीच तासात ट्रम्प यांनी बायडन सरकारचे ७८ निर्णय एका दमात रद्द केलेत. जागतिक आरोग्य संघटनेमधून अमेरिका बाहेर पडल्यावर कोरोना काळामध्ये चीन आणि डब्ल्यूएचओवर ट्रम्प यांनी गंभीर आरोप केले होते. डब्ल्यूएचओमध्ये अमेरिका सर्वाधिक निधी देणारा देश होता. त्यामुळे त्याच्या फटका ज्या गरीब देशांमध्ये डब्ल्यूएचओ आरोग्याचे काम करत होते त्यांना बसणार आहे. बायडेन यांचे ग्रीन एनर्जी धोरण रद्द करत ट्रम्प आता पारंपारिक इंधन उत्खननावर भर देणार आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग नावाचा प्रकार अस्तित्वात आहे. यावर ट्रम्प यांचा विश्वास नाही. त्यामुळे सर्व प्रदूषणमुक्त करारातून अमेरिका बाहेर पडे आणि जास्तीत जास्त खनन करून इंधन निर्यातीवर भर देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय. यासह अमेरिकेमध्ये आता तृतीयपंथी आणि ट्रान्सजेंडरची फक्त स्त्री आणि पुरुष ही दोनच लिंग अमेरिकेच्या व्यवहारांमध्ये अस्तित्वात असतील. ट्रम्प सरकारच्या मते, सैन्यामध्ये ट्रान्सजेंडरचा समावेश केल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कमकुवत होते. त्यामुळे भविष्यात अमेरिकेमधली तृतीयपंथीयांचं काय होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
