Donald Trump : शपथविधी आधी काय घडलं? भारतीय वंशाच्या व्यक्तीने ट्रम्प यांना दिला मोठा झटका
Donald Trump : अमेरिकेची कमान संभाळल्यानंतर काही तासातच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला. सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी या भारतीय चेहऱ्याचा स्वत:च्या राजकारणासाठी वापर करुन घेतला असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही.

अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनात एक जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्याच्या काहीतास आधी आपण ही जबाबदारी स्वीकारत नसल्याच त्यांनी जाहीर केलं. ट्रम्प यांनी रामास्वामी यांना इलॉन मस्कर यांच्यासोबत मिळून नवीन विभाग DOGE संभाळायला सांगितला होता. पण त्यांनी लांब रहाण्याचा निर्णय घेतला. इलॉन मस्क यांच्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन रामास्वामी यांनी, ओहायो येथे भविष्यातील योजनांबद्दल खुलासा करणार असल्याच म्हटलं आहे.
माहितीनुसार, विवेक रामास्वामी ओहायोच्या गवर्नर पदाची निवडणूक लढू शकतात. बायडेन यांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकन व्यवस्थेवर सातत्याने हल्ले केले. त्यामुळे ते चर्चेत होते. डीप स्टेट, मिलिट्री-इंडस्ट्रियल काम्पलेक्स, उद्योग जगताला मिळणाऱ्या सरकारी लाभांवर त्यांनी सातत्याने टीका केली होती. विवेक रामास्वामी यांच्या या राजकीय भूमिकेमुळे राष्ट्रपती निवडणुकीत बायडेन-हॅरिस यांच्याविरुद्ध ट्रम्प यांची स्थिती बळकट झाली. रिपब्लिकन पार्टीकडून राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थन देण्याची घोषणा केली.
हा शुभ संकेत नव्हता
युवक आणि मध्यम वर्गीयांमध्ये विवेक रामास्वामी हा लोकप्रिय चेहरा आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प त्यांना उपराष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार बनवू शकतात असा अंदाज होता. पण असं झालं नाही. ट्रम्प यांनी त्यांना मोठ पद देण्याच आश्वासन दिलेलं. निवडणुकीतील विजयानंतर ट्रम्प त्यांची परराष्ट्र मंत्री पदावर नियुक्ती करु शकतात, अशी विवेक यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. पण ट्रम्प यांनी त्यांना इलॉन मस्कच्या नेतृत्वाखाली बनलेला नवीन विभाग DOGE सोबत जोडलं. विवेक रामास्वामी यांच्या राजकीय करिअरसाठी हा शुभ संकेत नव्हता. वेळीच विवेक रामास्वामी यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा सुद्धा केली.
ट्रम्प यांनी भारतीय चेहऱ्याचा राजकीय वापर केला
विवेक रामास्वामी हे भारतीय वंशाचे व्यावसायिक, लेखक आणि राजकीय नेते आहेत. मागच्यावर्षी रिपब्लिकन पार्टीकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून स्वत:च नशीब आजमावलं. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीसमोर ते टिकू शकले नाहीत. पण आपले राजकीय विचार आणि आक्रमक भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. ट्रम्प यांनी अनेक प्रसंगी विवेक रामास्वामी यांचं भरपूर कौतुक केलं. निवडणूक जिंकल्यानंतर विवेक रामास्वामी यांना मोठी जबाबदारी देण्याच आश्वासन दिलं. विवेक रामास्वामी यांच्या समर्थकांना असं वाटतं की, भारतीय वंशाचे मतदार आणि युवा वर्गाच्या मतदारांना भुलवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांचा राजकीय वापर केला.