हैराण करणारी बातमी! ऐकीकडे द्विपक्षीय व्यापाराची चर्चा अन्… अमेरिकेचा भारताला पुन्हा दणका, थेट 60…
अमेरिकेने भारतासह जवळपास 60 देशांविरोधात अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडल्याने आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असतानाच अमेरिकेच्या United States Trade Representative (USTR) कार्यालयाने हा इशारा दिला आहे.
अमेरिकेने भारतासह जवळपास 60 देशांविरोधात अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडल्याने आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असतानाच अमेरिकेच्या United States Trade Representative (USTR) कार्यालयाने हा इशारा दिला आहे. अमेरिकेने काही देशांवर अन्यायकारक व्यापार पद्धतींचा आरोप केला असून त्यावर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे.
या प्रस्तावानुसार संबंधित देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 ते 12.5 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार चर्चेत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
USTR ने ‘सेक्शन 301’ अंतर्गत केलेल्या तपासात भारताचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे. सक्तीच्या मजुरीतून तयार होणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे भारतीय निर्यात क्षेत्र आणि व्यापार धोरणावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 03, 2026 01:38 PM
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं

