ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात… एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
मुंबई महानगरपालिकेत लवकरच मोठा राजकीय धमाका होण्याची शक्यता आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दावा केला आहे की, विरोधी पक्षातील ठाकरे सेनेचे अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. साटम यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटापाठोपाठ भाजपही ठाकरे गटाला मोठा हादरा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबई महानगरपालिकेत लवकरच मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे की, विरोधी पक्षातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. मुंबई भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना साटम यांनी हे वक्तव्य केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
साटम यांच्या म्हणण्यानुसार, महायुतीचे सध्याचे ८९ शिवसेनेचे २९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तीन-चार असे एकूण १२०-१२२ नगरसेवक आहेत. मात्र, उर्वरित शंभर एक नगरसेवकांमध्ये एक वेगळी उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले आहे. अनेकांना लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगामी काळात काय होईल, हे सांगता येत नाही असे साटम म्हणाले. गेल्या सहा महिन्यांमध्ये भाजप आणि महायुतीने केलेल्या कामामुळे अनेक उबाठा नगरसेवक खासगीत येऊन संपर्क साधत आहेत. त्यांच्या मते, ठाकरे गटाच्या नेत्यांनी केवळ मराठीच्या गप्पा मारल्या आहेत. या दाव्यामुळे शिंदे गटापाठोपाठ आता भाजपही ठाकरे गटाला राजकीय धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Published on: Sep 02, 2026 02:48 PM
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

