Amit Thackeray | ‘माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल’ अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृहात पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी भाजपच्या गुन्हे दाखल करण्याच्या मागणीवर अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवरायांसाठी दुसरा गुन्हा दाखल झाला तरी चालेल, असे ते म्हणाले. या दौऱ्यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृहातील अधीक्षकांच्या कार्यालयातून छत्रपती शिवरायांच्या शेजारील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याच्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजप) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावर अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “माझा पहिला गुन्हा महाराजांसाठी होता आणि दुसरा गुन्हाही महाराजांसाठी दाखल झाला तरी मला अभिमान आहे.
भाजप जर आमच्यावर गुन्हा दाखल करत असेल, तर तो गुन्हा स्वीकारायला मी तयार आहे,” असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांसह तरुणाईकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या दौऱ्यात अमित ठाकरे यांनी शहरातील सात प्रमुख महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृहात विद्यार्थ्यांना खराब दर्जाचे अन्न मिळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला. सध्या अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Published on: Aug 31, 2026 04:24 PM
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर

