Video : शिवजयंतीदिनी अमोल कोल्हे यांचं आंदोलन; केंद्र आणि राज्य सरकारला इशारा
किल्ले शिवनेरी : आज शिवजयंतीदिनी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं ‘भगवा जाणीव आंदोलन’ सुरू आहे. यावेळी tv9 मराठीशी बोलताना त्यांनी आपली मागणी बोलून दाखवली. ” किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावलाच पाहिजे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावर भगवा का लावू शकत नाही? तो लावलाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्र शासनाकडे ठामपणे ही […]
किल्ले शिवनेरी : आज शिवजयंतीदिनी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं ‘भगवा जाणीव आंदोलन’ सुरू आहे. यावेळी tv9 मराठीशी बोलताना त्यांनी आपली मागणी बोलून दाखवली. ” किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावलाच पाहिजे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावर भगवा का लावू शकत नाही? तो लावलाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्र शासनाकडे ठामपणे ही मागणी केली पाहिजे, असं अमोल कोल्हे म्हणालेत. एक वर्षाची मुदत आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारला देतो आणि जर पुढच्या शिवजयंतीला ध्वज फडकला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करणार, असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिलाय.
Published on: Feb 19, 2023 09:53 AM
Follow Us
Latest Videos
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

