हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता नेमकं काय म्हणाला?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी कऱण्यास सुरूवात केली आहे. अशातच येत्या विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघात बाप लेकीसह पुतण्यात राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे. बघा यासंदर्भातील व्हिडीओ
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात विधानसभेत राजकीय लढत पाहायला मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी नुकताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली तेव्हा त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा झाला. या पक्ष प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे अमरीश आत्राम यांनी जोरदार निशाणा साधला आहे. अमरीश आत्राम टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ते म्हणाले, “हा सर्व धर्मराव आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा गेम आहे. जर दोन्ही पक्षातून कोणीही निवडून आले तर आमदारकी घरीच राहणार हा आत्राम यांचा गेम आहे” तर कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध आणि भाग्यश्री आत्राम यांच्यातील राजकीय लढत होण्याची शक्यता असताना माजी आमदार अमबरीश आत्राम हे महायुतीतून तिकीट मिळालं नाही, तर बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारीत असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले.
Published on: Sep 14, 2024 01:20 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
