JayashreePatil | अनिल देखमुख CBI तपासाला सहकार्य करत नाही, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI च्या प्राथमिक तपासात क्लिनचिट मिळाल्याची बातमी समोर आल्यानंतर अनिल देखमुख CBI तपासाला सहकार्य करत नाही असा आरोप याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले होते. याबाबत सीबीआय विभाग चौकशी करत असून तपास सुरु आहे. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना CBI च्या प्राथमिक तपासात क्लिनचिट मिळाल्याच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. यावर बोलताना याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी देशमुखांवर पुन्हा काही आरोप केले आहेत. अनिल देखमुख CBI तपासाला सहकार्य करत नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
Latest Videos
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक

