VIDEO : Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा झटका, देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीने (ED) जप्त केली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीने ही पहिली मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीने (ED) जप्त केली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीने ही पहिली मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील मालमत्तेवर टाच आणल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र देशमुखांचा वरळीमधला एक फ्लॅट आणि पनवेलमधील एका जमिनीवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 4 कोटी 54 लाख रुपयांचा वरळीतला फ्लॅट आणि 2 करोड 67 लाख रुपयांची उरणमधील धुतुम गावातील जमीन जी सलील देशमुख यांच्या कंपनीच्या नावावर होती ती जप्त करण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI