कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर ‘तो’ दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.. , अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
धाराशिवच्या कळंबमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या झाली. याच महिलेला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी तयार केल्याचा संशय व्यक्त होतोय. पण यावरून आता दमानिया यांनी आणखी एक आरोप केलाय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांच्या मेहुण्यांना देखील अडकवणार होते असं दमानिया यांचं म्हणणं आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर प्रकरणाला कलटणी देण्यासाठी जी महिला तयार करण्यात आली होती ती कळंबची हत्या झालेलीच महिला मनीषा बिडवेच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. यासंदर्भात पोलिसांनी दोघांना अटकही केली. पण मनीषा बिडवेला हाताशी धरून सहा ते सात जणांना अडकवण्याचा डाव होता असा गौप्यस्फोटही अंजली दमानिया यांनी केलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदाराच्या मेहुण्यालाही अडकवणार होते असं म्हणत खासदाराचं नाव घेणं मात्र दमानिया यांनी टाळलंय. पण बिडचे खासदार बजरंग सोनवणींनीही मलाही अडकवण्याचा प्रयत्न असला असेल हे स्वतःहून सांगितलं.
अनैतिक संबंध आणि पैशातून महिलेची हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच चौकशीतून थरारक माहिती समोर आली आहे. रामेंश्वर उर्फ राण्या भोसले आणि उसमान गुलाब सय्यद अशी या आरोपींची नाव आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले मृतदेहासोबत त्याच खोलीत दोन दिवस झोपला. मृतदेहा शेजारी बसूनच त्याने जेवणही केलं. मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागला. त्यामुळे मृत महिला मनीषा बिडवेची गाडी घेऊन तो बाहेर पडला. त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेने केज इथल्या मित्राला घेऊन येत मृतदेह दाखवला. रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा. पुढे काय घडलं बघा?
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

