Jaykumar Gore Video : ‘मानसिक त्रास, अश्लील शिव्या अन् तसले फोटो…’, जयकुमार गोरेंविरोधात पीडित महिला आक्रमक, उपोषणाला बसणार
जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेसंदर्भात आरोप झाले आहेत. मात्र कोर्टाचा दाखला देत जयकुमार गोरेंनी सर्व आरोप फेटाळून लावले असून बदनामी करणाऱ्या विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.
राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेसंदर्भात आरोप झाले आहेत. मात्र कोर्टाचा दाखला देत जयकुमार गोरेंनी सर्व आरोप फेटाळून लावले असून बदनामी करणाऱ्या विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना पीडित महिला समोर आली असून तिने राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे गोरेंची तक्रार करणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच गोरेंच्या विरोधात येत्या १७ तारखेला उपोषणाला बसणार असल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. ‘२०१५-२०१६ चं हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी मला प्रचंड मानसिक त्रास दिला होता. वेगवेगळ्या नंबरवरून वेगवेगळे फोटो पाठवले होते. फक्त फोटोच नाही तर अश्लील शिव्या देखील त्यांनी माझ्यासह माझ्या आईला दिल्या होत्या.’, असं वक्तव्य पीडित महिलेने केले आहे. दरम्यान, जयकुमार गोरे यांनी असे कृत्य केल्याप्रकरणी फक्त माफी मागावी अशी माझी अपेक्षा होती. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची माफी मागितली नाही. इतकंच नाहीतर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. २०१६ साली गोरेंविरोधात याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. तरीही त्यांनी बदनामी सुरूच ठेवली, अशी माहितीही पीडित महिलेने दिली.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
