Tamil Nadu- West Bengal By-Elections | कुणाचं सरकार येणार? मतदान सुरू, सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान? घ्या जाणून
देशातील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मतदानाची प्रक्रिया सुरू असून, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसोबतच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, दोन्ही राज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात मतदान नोंदवण्यात आलं आहे.
देशातील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मतदानाची प्रक्रिया सुरू असून, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसोबतच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, दोन्ही राज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात मतदान नोंदवण्यात आलं आहे. तामिळनाडूमध्ये 17.69 टक्के, तर पश्चिम बंगालमध्ये 18.76 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या सर्व 234 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे, तर पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी मतदान पार पडत आहे. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान 29 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 4 मे रोजी होणार असून, निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 23, 2026 12:10 PM
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....

