28 दिवसानंतर प्रशासनाला जाग, अखेर महापालिकेवरील औरंगाबाद नाव हटवलं
24 दिवस गेले तरी औरंगाबाद महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयाची नावे औरंगाबादच या मथळ्याखाली tv9 मराठीने बातमी केली
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर शहरात यावरून मोठा गदारोळ झाला. एमआयएमने विरोध केल्यावर काही हिंदू संघटना आणि मनसेकडून नामांतर समर्थनार्थ आंदोलने केली. त्यादरम्यान 24 दिवस गेले तरी औरंगाबाद महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयाची नावे औरंगाबादच या मथळ्याखाली tv9 मराठीने बातमी केली होती. तर या कार्यालयांवरचे औरंगाबाद नाव कधी हटवणार असा प्रश्न केला होता. त्यानंतर आज अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली. तर महापालिके वरील औरंगाबाद हे नाव हटवण्यात आलं आहे. तर लवकरच छत्रपती संभाजीनगर हे नाव लावले जाणार आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयांची नावेही लवकरच बदल करण्यात येणार आहेत.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

