एमआयएमला तिसरा मोठा झटका, MIM च्या माजी नगरसेविकेचा पतीसह राष्ट्रवादीत प्रवेश

औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक धक्का बसला आहे. MIM च्या माजी नगरसेविकेने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक धक्का बसला आहे. MIM च्या माजी नगरसेविकेने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारुकी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. अलिकडेच एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता. महापालिका निवडणुकांच्या आधीच एमआयएममध्ये गळती सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये एमआयएमला झटका बसण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI