कल्याणमध्ये रिक्षाचालकांचीच फ्री स्टाईल हाणामारी, रेल्वे स्टेशन परिसरात घडलं काय? बघा व्हिडीओ
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्यावरून जोरदार हाणामारी झाली आहे. भर रस्त्यात रिक्षा चालकांची हाणामारी झाली आहे. फिल्मी स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या हाणामारीमुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात बघ्यांची गर्दी वाढत चालली आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्यावरून जोरदार हाणामारी झाली आहे. भर रस्त्यात रिक्षा चालकांची हाणामारी झाली आहे. त्याची ही दृश्य समोर आली आहेत. फिल्मी स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या हाणामारीमुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात बघ्यांची गर्दी वाढत चालली आहे. रिक्षा थांबवण्यावरून हा वाद सुरू होता किरकोळ झालेला वाद टोकाला पोहोचला आणि वादाचं रूपांतर तुंबळ हाणामारीत झालं. दोन-तीन रिक्षा चालकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही रिक्षाचालकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेचा व्हिडीओ कल्याणमध्ये तुफान व्हायरल होत असून रिक्षा वाल्यांची मुजोरी, अरेरावी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड

