महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी हे कुळगाव बदलापूर नारपालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक झालेत. यामुळे राजकीय वर्तुळात एक नवीन वाद पेटल्याचे दिसून येत आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. अक्षय शिंदे प्रकरणात सहआरोपी म्हणून शाळेच्या संचालकांचा पण समावेश होता. हे संचालक या प्रकरणानंतर फरार होऊन सरेंडर झाले होते. तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी हे कुळगाव बदलापूर नारपालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक झालेत. यामुळे राजकीय वर्तुळात एक नवीन वाद पेटल्याचे दिसून येत आहे.
यावर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. आक्रमक होत संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? लैंगिक अत्याचाराबद्दल आपटेंना भाजपने बक्षिस दिलंय का? असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आपटे या प्रकारांतून निर्दोष सुटले नाहीत आणि न्यायालयात या प्रकरणाचा खटला देखील चालू नाही आहे. खटला चालू दिला जात नाही आहे भाजपकडून असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. आपटेंना स्वीकृत नगरसेवक बनवल्याने एक नविन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड

