Bacchu Kadu : मोठी बातमी, बच्चू कडूंची प्रकृती बिघडली, डॉक्टर बायको घटनास्थळी, कार्यकर्ते टेन्शनमध्ये
शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांचं गेल्या चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली.
माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अशातच बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. बच्चू कडू यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. घटनास्थळी बच्चू कडू यांच्या पत्नी डॉ नयना कडू या बच्चू कडू यांच्या भेटीला दाखल झालेत.
तर बच्चू कडू यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते शेतकरी गुरुकुंज मोझरीत दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली नसल्याने बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांनी सरकारला थेट टोकाचा इशारा दिला आहे. जास्त त्रास दिला तर मुंबई गाठणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...

