Bachchu Kadu : 6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र, बघा काय म्हटलं?
आतापर्यंत महायुती सरकारमधील संकटमोचक म्हणून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतले जात होते. मात्र आज बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी दाखल झालेले उदय सामंत महायुती सरकारचे नवे संकटमोचक ठरल्याचे पाहायला मिळाले
बच्चू कडू यांना सरकारकडून आश्वासनाचं पत्र देण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसात उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. उर्वरित मुद्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडू यांनी आज आपलं उपोषण सोडलं. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता. मात्र आज सहाव्या दिवशी बच्चू कडूंनी उपोषण स्थगित केलंय.
बच्चू कडूंना काय-काय दिले आश्वासन?
शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल.
समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणार.
थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यात येईल.
नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद केली जाईल.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

