Uday Samant : उदय सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंनी घेतला मोठा निर्णय
शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. त्यांनी बच्चू कडू यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला त्यानंतर आज शनिवारी उदय सामंत यांनी कडूंची भेट घेतली आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे.
अमरावती येथे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता. आज शिवसेनेचे नेते आणि महायुती सरकारचे मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. त्यानंतर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचे पाहायला मिळाले. आज सातव्या दिवशी बच्चू कडू यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
आतापर्यंत महायुती सरकारमधील संकटमोचक म्हणून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतले जात होते. मात्र आज बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी दाखल झालेले उदय सामंत महायुती सरकारचे नवे संकटमोचक ठरल्याचे पाहायला मिळाले. बच्चू कडू यांना भेटण्यासाठी आलेल्या उदय सामंतांनी सरकारचे एक पत्र त्यांना दिले. यावेळी शासनाच्या या पत्राचे उदय सामंत यांच्याकडून वाचनही करण्यात आले. कर्जमाफीसंदर्भात येत्या 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल, असे उदय सामंत म्हणाले तर बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचं पत्र घेऊन आलो असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले.

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली
