Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांचं मोठं विधान, ‘सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे सांगण्याची खरी वेळ…
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. आज या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत सांगता सभा आहे. या सभेत अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. या सांगता सभेदरम्यानच मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या जागी ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराची सांगता सभा आज पार पडते आहे. त्यावरच बोलताना मंत्री अदिती तटकरे या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्या म्हणाल्या, ‘अजित दादांसारखी व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली नाही, मात्र हे स्वप्न सुनेत्रा काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल’.
याच वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, ‘सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील, मात्र हे सांगण्याची खरी वेळ अजून आलेली नाही. निवडणूक काळात अशी विधानं करू नये, तटकरेंचं हे वक्तव्य मला पटलेलं नाही’
Published on: Apr 21, 2026 03:56 PM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...