Baramati Election | मोठी बातमी! कलांनुसार आघाडीवर असताना सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांना भावनिक संदेश, विजयाचा गुलाल…
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला वेग आला असून, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच आघाडीचे स्पष्ट चित्र समोर येऊ लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला वेग आला असून, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच आघाडीचे स्पष्ट चित्र समोर येऊ लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेत विरोधकांना मागे टाकले आहे. सध्या त्या तब्बल 36,591 मतांनी आघाडीवर आहेत.
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, “अजित पवारांच्या आठवणींत आज सर्व जण भावूक झाले आहेत. मात्र, कोणीही गुलाल उधळू नये आणि जल्लोष करू नये,” असा सुनेत्रा पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.
दरम्यान, भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी येथे पोटनिवडणूक होत असून, येथे भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, अक्षय कर्डिले यांनी 18,123 मतांची भक्कम आघाडी घेतली आहे.
Published on: May 04, 2026 11:17 AM
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन

