Bhupendra Patel | भुपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

Bhupendra Patel | गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांनी निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मुख्यमंत्रिपदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाईल हे ताडण्यासाठी राजकीय जाणकारांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झालं. आता पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्याची कार्यक्रमपत्रिका लवकरच जाहीर केली जाणार आहे. (

नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भूपेंद्र पटे यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले. गांधीनगरमध्ये भाजप कार्यालायात ही बैठक आयोजित आली होती. भूपेंद्र पटेल हे घरलोदिया येथून आमदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे समजले जातात. भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापती म्हणून देखील काम पाहिलं आहे. भूपेंद्र पटेल हे शहरी भागातून येतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI