AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरज चव्हाणनं झापुक झुपुक करत पटकावली 'बिग बॉस'ची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....

सुरज चव्हाणनं झापुक झुपुक करत पटकावली ‘बिग बॉस’ची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला….

| Updated on: Oct 08, 2024 | 4:49 PM
Share

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Suraj Chavan Winner 2024 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन पाचच्या विजयानंतर सूरज चव्हाण याचं राज्यभरातून कौतुक केलं जात आहे. राज्यभरातून अनेक दिग्गज कलाकारांकडून सूरजचं अभिनंदन केलं जात असताना या विजयानंतर त्याने पहिल्यांदा आपल्या बारामतीत एन्ट्री केलीये

बारामतीच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता ठरला. तर गायक अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तिसऱ्या क्रमांकावर निक्की तांबोळी आणि चौथ्या क्रमांकावर धनंजय पोवार होता. 70 दिवस सुरू असलेल्या ‘बिग बॉस मराठी 5’या शोमध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत होता तो साधाभोळा, गरिब घराण्यातील सूरज चव्हाण… ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता होता सूरज चव्हाण याने बिग बॉसची झगमगती ट्राफी आणि 14.60 लाख रुपये बक्षीस मिळवले. त्याचसोबत इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाख रुपयांचा ज्वेलरी व्हाऊचरही त्याला देण्यात आले. सूरजचा खेळ, प्रामाणिकपणा, वैयक्तिक आयुष्यातील खडतर प्रवास सूरजने आपले वेगळे चाहते बनवले. सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ चा विजेता घोषित झाल्यानंतर त्याच्यावर सर्वांकडूनच कौतुकांचा वर्षाव केला जातोय. यामध्ये मराठी कलाकार, सामान्य जनतेपासून ते राजकीय नेते मंडळींनी देखील सूरज चव्हाणचं तोंडभरून कौतुक करत सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट टाकल्या. यानंतर आता ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर झापुक झुपुक फेम सुरजचं बारामतीत जंगी स्वागत करण्यात आलं. बघा स्वागतावेळी काय म्हणाला सूरज…

Published on: Oct 08, 2024 04:49 PM