Bihar Election : बिहारच्या फ्लॅट नं. 107 ची का होतेय चर्चा? एकाच घरात त्रिपाठी, सिन्हा अन् मोहम्मद? गौडबंगाल नेमका काय?
मतदार यादीच्या आरोपांबरोबरच सध्या बिहारमधलं एक घर चांगलंच चर्चेत आलंय. एकाच घरामध्ये विविध जाती आणि धर्माचे मतदार कसे? असा प्रश्न आता विरोधकांनी निवडणूक आयोगाला विचारलाय.
राहुल गांधींच्या आरोपानंतर मतदार यादीचा वाद चर्चेत असताना बिहारमधल्या एकाच घरातल्या मतदारांच्या यादीवरुन सुद्धा आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. बिहारमध्ये निवडणूक आयोगान जाहीर केलेल्या नव्या मतदार यादीत मोठा घोटा असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांसह विरोधकांनी केलाय. बिहारच्या दिघा मतदार संघातल्या एका मतदार यादीत 107 क्रमांकाच्या घरात विविध जात आणि धर्मांचे मतदार कसे काय? असा प्रश्न विरोधक विचारतायेत. समोर आलेली व्हायरल मतदारांच्या यादीत 16 मतदारांचा घरांचा नंबर 107 चा आहे. विशेष म्हणजे या एकाच घरात त्रिपाठी, प्रसाद, सिन्हा, देवी, कुमार, सिंह या आडनावांसह मोहम्मद साबीर आणि मोहम्मद सफी आलम या मुस्लिम मतदारांची सुद्धा नावे दिसतायेत. त्यामुळे हे नेमकं कसं काय घडलं यावरून विरोधक टीका करतायेत. बघा यावरचाच स्पेशल रिपोर्ट
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

