मर्द असाल तर…., संजय राऊत यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘तो’ फोटो ट्विट, भाजपचं चॅलेंज काय?
मकाऊतील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कॅसिनोतील फोटोवरून आरोप-प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. राऊत यांनी पुन्हा आपल्याकडे २७ फोटो आणि पाच व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे. तर हा दावा केल्यानंतर एक तरी फोटो दाखवा असं थेट आव्हान भाजपच्या मोहीत कंबोज यांनी केलंय.
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : मकाऊतील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कॅसिनोतील फोटोवरून आरोप-प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. राऊत यांनी पुन्हा आपल्याकडे २७ फोटो आणि पाच व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे. तर हा दावा केल्यानंतर एक तरी फोटो दाखवा असं थेट आव्हान भाजपच्या मोहीत कंबोज यांनी केलंय. संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो टाकून ट्वीट केलं आणि भाजप विरुद्ध संजय राऊत असा सामना रंगला आहे. जुगार खेळण्यासाठी कॅसिनोमध्ये ३. ५ कोटी उडवल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. या आरोपांवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट चांगलेच तुटून पडले आहेत. इतकंच नाहीतर भाजपचे नेते देखील या ट्वीट वरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नितेश राणे यांनीही राऊतांच्या चीनच्या दौऱ्यावर बोट ठेवलंय. बघा कुणी काय केला हल्लाबोल?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग

