राष्ट्रीय नेता झाले नाही पण राष्ट्रीय विदूषक झाले, राहुल गांधी यांना कुणी लगावला खोचक टोला?
वर्ल्ड कप सामन्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला होता. यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर राहुल गांधींनी आपल्या राजकारणाचा नाही तर किमान आपल्या विनोदांचा दर्जा सुधारावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिलाय.
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : काहीही असेल आपली टीम जिंकली असती. पण पनौतीने पराभूत केलं, वर्ल्ड कप सामन्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला होता. यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय. नरेंद्र मोदी यांच्यावर बेताल टीका करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध. राहुल गांधींनी आपल्या राजकारणाचा नाही तर किमान आपल्या विनोदांचा दर्जा सुधारावा. अथक प्रयत्न करूनही राष्ट्रीय नेता होऊ न शकलेले राहुल गांधी राष्ट्रीय विदूषक नक्कीच झाले आहेत, असे म्हणत गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर परिपूर्ण शारीरिक वाढ होऊन सुद्धा बालबुध्यांक तसाच राहिलेल्या राहुल गांधींना उत्तम मानसिक विकासासाठी आमच्या शुभेच्छा, असे म्हणत गिरीश महाजन यांनी खोचक टोला लगावला आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

