ठाकरे गटात सर्वच सोंगाडे अन् 420, भास्कर जाधव सोंगाडे तर संजय राऊत भांडूपचे…, भाजप नेत्यांचा हल्लाबोल
'संजय राऊतने हे सांगावे 2004 ते 2016 पर्यत राज्यसभेच्या निमिताने तुमच्या अँफिडेव्हीटमध्ये तुमचा वाढदिवस हा 15 एप्रिल 1961 ला आहे आणि 2016 ते 2028 पर्यत तुम्ही जे अँफिडेव्हीट भरलं त्यामध्ये तुमचा वाढदिवस 15 नोव्हेंबर 1961 ला आहे. नेमकी जन्म तारीख का बदलली?', नितेश राणेंचा सवाल
मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३ | उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्वजण सोंगाडे आणि 420 आहेत, असे म्हणत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. इतकेच नाही तर भास्कर जाधव हे चिपळूनचे सोंगाडे आहेत तर संजय राऊत हे भांडूपचे देवानंद आहेत, असे म्हणत नितेश राणे यांची खोचक टीका केली आहे. काही लोक जन्मजात सोंगाडे असतात. संजय राजाराम राऊतने हे सांगावे 2004 ते 2016 पर्यत राज्यसभेच्या निमिताने तुमच्या अँफिडेव्हीटमध्ये तुमचा वाढदिवस हा 15 एप्रिल 1961 ला आहे आणि 2016 ते 2028 पर्यत तुम्ही जे अँफिडेव्हीट भरलं त्यामध्ये तुमचा वाढदिवस 15 नोव्हेंबर 1961 ला आहे. नेमकी जन्म तारीख का बदलली? असा सवाल नितेश राणे यांनी राऊत यांना केला तर ही जन्मतारीख बदलण्यात कुठली 420 शी आहे. याचे स्पष्टीकरण राज्यातील जनतेला मिळाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

