नुसतं नावातच ‘राम’ नाही तर तो हृदयातही हवा, रामदास कदम यांच्यावर महिला नेत्याची सडकून टीका
'रामदास कदम यांनी सर्वच प्रकारच्या पातळ्या ओलांडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काय भाष्य करावं. अनिल परब यांचा आजही नेते म्हणून उल्लेख होतो. गजानन किर्तीकर हे त्यांच्यात पक्षातले असून त्यांच्यावर रामदास कदम टीका करतात. रामदास कदम यांना सगळेच वाईट आहेत'
मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३ | नुसतं नावातच राम असून चालत नाही तर तो हृदयात किंवा कामात देखील राम हवा, असे म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणकर यांनी शिवसेना नेते आणि आमदार रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे. रामदास कदम यांनी सर्वच प्रकारच्या पातळ्या ओलांडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काय भाष्य करावं. अनिल परब यांचा आजही नेते म्हणून उल्लेख होतो. गजानन किर्तीकर हे त्यांच्यात पक्षातले असून त्यांच्यावर रामदास कदम टीका करतात. रामदास कदम यांना सगळेच वाईट आहेत, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. तर रामदास कदम स्वतः एकटेच चांगले आहेत, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांना खोचक टोलाही लगावला आहे.
Latest Videos
Latest News