AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'कितीही नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', उद्धव ठाकरेंवर कोणाचा हल्लाबोल?

‘कितीही नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही’, उद्धव ठाकरेंवर कोणाचा हल्लाबोल?

| Updated on: Sep 20, 2024 | 5:03 PM
Share

सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पक्षातील नेते आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी बैठका घेऊन जोरदार रणनिती आखत आहे. अशातच महाविकास आघाडीतील नेते बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केलाय. तर संजय राऊत देखील मुख्यमंत्रीपदावर भाष्य करताना दिसताय.

काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासमोर कितीही नाक रगडलं तरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिद मिळणार नाही, अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली. नितेश राणे यांनी केवळ उद्धव ठाकरेंवरच नाहीतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. लोकसभेत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट कमी असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी फुशारक्या मारू नये, असे म्हणत नितेश राणेंनी सडकून टीका केली आहे. ‘महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे संजय राऊतला सर्व आठवतेय. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे शिवसेना दुसरा भाऊ आहे. उद्धव ठाकरे यांना या जन्मात तरी मुख्यमंत्री पद मिळणार नाही, असे नितेश राणे म्हणाले तर कितीही प्रयत्न केला तरी संजय राऊत यांनी फुशरक्या मारू नये. तुमचा स्टाईक रेट् कमी आहे, असे म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावरच निशाणा साधला आहे.

Published on: Sep 20, 2024 05:03 PM