AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar : गाडीतनं उतरले अन् कोयता, तलवार काढली... पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण

Gopichand Padalkar : गाडीतनं उतरले अन् कोयता, तलवार काढली… पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण

| Updated on: Aug 08, 2025 | 10:52 AM
Share

गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे फिल्मी स्टाईलनं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचलाय.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे फिल्मी स्टाईल आपहरण करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे फिल्मी स्टाईलनं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचलाय. या प्रकरणानंतर आपल्या समर्थकाला भेटण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आज सोलापूरला दाखल होणार आहेत. ज्याने गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे अपहरण केले त्याचे नाव अमित सुरवसे असे असून त्याने यापूर्वी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला केला असल्याची देखील माहिती आहे. त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे अपहरण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

आमदार पडळकर यांच्या समर्थकाच्या अपहरण प्रकरणात जखमी शरणु हांडे याच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय. जखमी शरणु हांडे याचा भाऊ विष्णू शिवराया हांडे याची पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी अमित सुरवसेसह ६ अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

Published on: Aug 08, 2025 10:52 AM