AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadabhau Khot : 'आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा...', शरद पवारांच्या आजारावरून सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य

Sadabhau Khot : ‘आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा…’, शरद पवारांच्या आजारावरून सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Nov 06, 2024 | 5:19 PM
Share

sadabhau khot controversial statement about sharad pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरून जोरदार प्रचार करत आहेत. तर प्रचारसभांचा धडाका सुरू असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना राजकीय मंडळी दिसताय. अशातच जतमधील महायुतीच्या सभेत सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दांत टीका करत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन वक्तव्य करताना “आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असा खोचक सवाल केलाय. “महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुला कसला चेहरा पाहिजे?” असं वादग्रस्त वक्तव्य जतमधील महायुतीच्या सभेत सदाभाऊ खोत यांनी केलंय. यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत खालच्या शब्दात टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

Published on: Nov 06, 2024 05:19 PM