‘त्या’ मागणीला माझेही समर्थन म्हणत भाजप खासदाराची जलील यांच्यावर सडकून टीका़
VIDEO | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारण, भाजप खासदार म्हणतात...
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे नामांतर झाल्यानंतर औरंगाबादमधील राजकारण वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून औरंगाबाद शहराचे नामाकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर त्या नावाला विरोध दर्शवत खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बेमुदत आंदोलन पुकारले. यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून भाजपचे खासदार भागवत कराड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. जलील यांचे नामांतराविरोधी उपोषण चुकीचे असून औरंगाबाद शहराचे नामांतर केल्यानंतर त्याच्यावरून राजकारण करण्याचे कारस्थान केले जात आहे. मात्र ते चुकीचे असल्याचे त्यांनी भागवत कराड यांनी म्हटले आहे. तर आमदार संजय शिरसाट यांनी औरंगजेबची कबर हैद्रराबादला हलवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यावरूनही आता भागवत कराड यांनी त्यांचे अभिनंदन करत औरंगजेब कबरीबद्दल केलेल्या वक्तव्याचं मी समर्थन करत असल्याचे कराड यांनी सांगितले.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...

