Nishikant Dubey : दुबेंनी पुन्हा ठाकरे बंधूंना डिवचलं, मनसे अन् ठाकरेंची सेना BMC निवडणुकीनंतर संपणार….
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मराठी वरून ठाकरे बंधूंना डिवचले. मुंबईत 30 टक्केच मराठी आहेत आणि मुंबई महापालिका निवडणुकांनंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोघेही संपणार असल्याचा निशाणा दुबेंनी साधलाय.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण केला आहे. त्यांनी ठाकरे बंधूंना आणि त्यांच्या पक्षांना लक्ष्य करत मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना आणि मनसे संपतील असा दावा केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात यावर चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना डिवचलं. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर दोघेही संपतील असं निशिकांत दुबे म्हणाले. ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा हाती घेतल्यानंतर दुबेंनी पुन्हा एकदा मराठीवरून वाद पेटवण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये फक्त 30 टक्के मराठी आहेत असं दुबेंनी म्हटलं. दुबे एवढ्यावरच थांबले नाहीत तर मुंबई आणि महाराष्ट्राला तयार करण्यात उत्तर प्रदेश आणि बिहारींचा योगदान आहे, असं सांगून मराठी विरुद्ध अमराठी वादाची फोडणी सुद्धा त्यांनी दिली. निशिकांत दुबे भाजपचे खासदार आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांनीच दुबेंचे कानही टोचले. आता दुबे एवढ्यावरच थांबणार का? हे दिसेलच.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?

