महाराष्ट्राला आम्ही पोसतो, म्हणणाऱ्या दुबेंना महाराष्ट्राच्या वाघिणी नडल्या
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना संसद भवन परिसरात अचानक गाठून घेराव घातला.
निशिकांत दुबे यांचे अस्तित्व काय? ते महाराष्ट्राबद्दल वक्तव्य करत आहेत? असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. राज्यसभेत पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. यावेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना संसद भवन परिसरात अचानक गाठून घेराव घातला. यावेळी या महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांच्यासमोर जय महाराष्ट्राच्या घोषणा देखील दिल्या.
राज्यातील हिंदी सक्तीला विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेन आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मोर्चा काढला होता. यातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणी नंतर त्याची चर्चा देशभर झाली होती. या वादात उडी घेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्र विषयी अपशब्द वापरले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता मविआच्या महिला खासदारांनी संसद भवन परिसरात निशिकांत दुबे यांना सळो की पळो करून सोडलं. मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार आहात? तुमची ही अशी अर्वाच्य भाषा कशी? तुमचे वागणे आणि बोलणे योग्य नाही? मराठी भाषिकांविरुद्ध तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही? अशा शब्दात या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना चांगलेच सुनावले. त्यामुळे निशिकांत दुबे यांना तिथून तात्काळ काढता पाय घ्यावा लागला.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो

