सकाळचे टोमणे बंद करा, राऊतांवर बावनकुळेंची टीका
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे आता फार कमी आमदार आणि खासदार राहिले आहेत. त्यामुळे उरलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी त्यांना सरकार पडण्याची वक्तव्य करावी लागत आहेत.
पुणे : उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला उत्तर देत असतात. ते सकाळ सकाळी विरोधकांचा समाचार घेतात. यावरून संजय राऊत यांच्याविरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे आता फार कमी आमदार आणि खासदार राहिले आहेत. त्यामुळे उरलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी त्यांना सरकार पडण्याची वक्तव्य करावी लागत आहेत.
संजय राऊत हे जगातील सर्वात विद्वान आहेत. राऊत हुशार आहेत, मात्र त्यांनी सकाळी सकाळी माध्यमांसमोर येऊन बोलण्यापेक्षा राज्याच्या हितासाठी चार गोष्टी कराव्यात, अशा राऊतांना कानपिचक्याही दिल्या. त्याचबरोबर त्यांनी सकाळचे टोमणे बंद करावेत. विरोधी पक्ष म्हणून जी जबाबदारी मिळाली आहे. ती जबाबदारी काय आहे, ती पार पाडावी. जगातल्या सर्वात विद्वानांपैकी एक संजय राऊत आहेत
महाराष्ट्राची जनता टोमणे सभा, टोमण्यांना कंटाळली आहे. यापेक्षा राज्याच्या जनतेला काय वाटतं हा प्लॅटफॉर्म तयार करावा, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
Published on: Jan 11, 2023 12:08 PM
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
