AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSF New Uniform : भारतीय सुरक्षा दलात मोठा बदल, आता नव्या लूकमध्ये दिसणार BSF चे जवान, कसा असणार युनिफॉर्म?

BSF New Uniform : भारतीय सुरक्षा दलात मोठा बदल, आता नव्या लूकमध्ये दिसणार BSF चे जवान, कसा असणार युनिफॉर्म?

| Updated on: May 31, 2025 | 11:46 AM
Share

२.७ लाख बीएसएफचे सैन्य पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमांचे रक्षण करण्यात तसेच नक्षलवादविरोधी, बंडखोरी आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. याच जवानांचं आता मेकओव्हर होत आहे.

भारतीय सुरक्षा दलात BSF (Border Security Force) आता एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. BSF सैनिकांच्या गणवेशात बदल करण्यात येणार असून आता जवानांना नवीन पोशाख मिळणार आहे. त्यामुळे आता लवकरच BSF चे जवान डिजीटल पॅटर्नसह नवीन गणवेशात दिसणार आहेत. बीएसएफमधील जवानांचा गणवेश बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील एका वर्षात संपूर्ण दल नवीन पोशाखात आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाने या नव्या बदलात विशेष लक्ष दिले आहे. सैनिकांच्या गणवेशातील रंगांच्या गुणोत्तरामध्ये ५०% खाकी, ४५% हिरवा आणि ५% तपकिरी रंगाचा वापर करण्यात आला आहे.

बीएसएफच्या परवानगीशिवाय कोणीही या डिझाइनची कॉपी करू शकत नाही, घालू शकत नाही किंवा शिवून घेऊ शकत नाही. जर कोणी असे केले तर ते बेकायदेशीर असून त्या व्यक्तीवर कारवाई करत थेट तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

Published on: May 31, 2025 11:46 AM