AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत

Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत

| Updated on: Jul 12, 2026 | 5:44 PM
Share

मुंबईकडे येणाऱ्या मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर आज मोठा परिणाम झाला आहे. आसनगाव-वाशिंद दरम्यान एका मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कल्याणहून आसनगावच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती पथक घटनास्थळी पाठवत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

दरम्यान, या बिघाडाचा फटका प्रवाशांनाही बसला असून, एक लोकल ट्रेन आणि दोन लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या सुमारे अर्धा तास रेल्वे मार्गावरच थांबून राहिल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम वेगाने सुरू असून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Published on: Jul 12, 2026 05:44 PM

Follow Us