राज्य मागासवर्ग आयोगात सारं काही अलबेल नाही? अध्यक्ष आनंद निरगुडे यांचा तडकाफडकी राजानीमा, पण का?
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आज विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता असतानाच हा राजीनामा राजकीय वर्तुळात एकच चर्चेचा विषय ठरतोय
मुंबई, १२ डिसेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आज विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता असतानाच हा राजीनामा राजकीय वर्तुळात एकच चर्चेचा विषय ठरत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी 4 डिसेंबर रोजीच राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा 9 डिसेंबरला स्वीकारण्यात आला. दरम्यान कमीत कमी शब्दात हा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. शिंदे यांना पाठवलेल्या या राजीनाम्यात त्यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण दिलं नसल्याने त्यांनी या पदाचा का राजीनामा दिला असेल याचे तर्क वितर्क लावण्यास सुरूवात झाली आहे.
Published on: Dec 12, 2023 11:14 AM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
