Video : ‘त्या’ विधानाबाबत चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी, म्हणाले…

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळेंबाबत (Supriya Sule) केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी राजकारणात न राहता ‘तुम्ही राजकारणात का आहात, घरी जाऊन स्वयंपाक करा. दिल्लीला जा किंवा स्मशानात जा, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या (MVA) महिला नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती जोरदार हल्ला […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 29, 2022 | 3:51 PM

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळेंबाबत (Supriya Sule) केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी राजकारणात न राहता ‘तुम्ही राजकारणात का आहात, घरी जाऊन स्वयंपाक करा. दिल्लीला जा किंवा स्मशानात जा, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या (MVA) महिला नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती जोरदार हल्ला केला होता. तसेच समस्त महिलांचा त्यांनी अवमान केला असून माफी मागावी अशी महिलांनी मागणी केली होती. आज चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबतत दिलीगिरी व्यक्त केली आहे. 12 महिला आमदार आणि 5 महिला खासदार असणाऱ्या पार्टीचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. सुप्रीया सुळेंबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. मी ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे त्यांना अपमानित व्हावं लागलं यासारखं आयुष्यात कोणतं दुःख नाही. मी समस्त माता भगिनींचा अपमान झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें