Sambhajinagar Video : 5 हजारांची साडी 199 रूपयांना… भन्नाट ऑफरनं महिलांची झुंबड चेंगराचेंगरीने खळबळ, संभाजीनगरात काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये साडीवरील मोठ्या सवलतीमुळे महिलांची प्रचंड गर्दी झाली. ५००० रुपयांची साडी केवळ १९९ रुपयांत मिळत असल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिला बेशुद्ध पडल्या तर काही जखमी झाल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करत दुकान बंद केले. आता गर्दी नियंत्रणासाठी बाऊन्सर्स तैनात करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात साडीवरील आकर्षक सवलतीमुळे महिलांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्यानंतर हे दुकान बंद करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पाच हजार रुपयांची साडी अवघ्या १९९ रुपयांत मिळत असल्याची जाहिरात व्हायरल झाली होती. या जाहिरातीमुळे मोठ्या संख्येने ग्राहक दुकानात जमा झाले. गर्दी अनियंत्रित झाल्याने तीन महिला बेशुद्ध पडल्याची तर दोन ते तीन महिला जखमी झाल्याची माहिती आहे. संक्रांतीचा सण जवळ आल्याने महिलांचा साड्या खरेदीकडे कल वाढला आहे आणि त्यातच स्वस्त किमतीमुळे ग्राहकांची झुंबड उडाली होती. घटनेनंतर आजपासून दुकानाच्या बाहेर बाऊन्सर्स तैनात करण्यात आले आहेत, जे गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ महिलांसाठीच नव्हे, तर पुरुषांच्या कपड्यांवरही सवलत असल्याने पुरुष ग्राहकांचीही रांग दिसून आली.
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा

