Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जोजवला शिवरायांचा पाळणा
छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 395 वी जयंती साजरी केली जात असल्याने शिवनेरी किल्ल्यावर या दिमाखदार सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जयंती सोहळा संपन्न जाला.
फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला गेला. ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार होता, त्याठिकाणी गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षरित्या सजावट करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 395 वी जयंती साजरी केली जात असल्याने शिवनेरी किल्ल्यावर या दिमाखदार सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जयंती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यादरम्यान, मान्यवरांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा देखील करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजवला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मर्दानी खेळांचे आयोजनही करण्यात आले होते.