AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगडमध्ये कोण मारणार बाजी? भाजप की काँग्रेस?

Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगडमध्ये कोण मारणार बाजी? भाजप की काँग्रेस?

| Updated on: Nov 24, 2023 | 5:37 PM
Share

छत्तीसगडमध्ये प्रादेशिक पक्ष किंगमेकरची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. बसपाने गोंडवाना गणतंत्र पार्टीशी युती केली आहे. राज्यात आम आदमी पार्टीसह छत्तीसगड जनता काँग्रेस (जोगी) आदी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात

Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा असून त्यापैकी 10 जागा अनुसूचित जाती तर 29 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. तर 51 जागा खुल्या वर्गासाठी आहेत. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी 20 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर रोजी 70 जागांवर मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. राज्यात कुणाचं सरकार बनणार याचा फैसला राज्यातील 2 कोटी 3 लाख 60 हजार 240 मतदार करणार असून राज्यात 790 तृतियपंथी आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारे 18 लाख मतदार आहेत. राज्यात काँग्रेस आणि भाजप दरम्यान मुख्य लढत असणार आहे. मात्र, प्रादेशिक पक्ष किंगमेकरची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. बसपाने गोंडवाना गणतंत्र पार्टीशी युती केली आहे. राज्यात आम आदमी पार्टीसह छत्तीसगड जनता काँग्रेस (जोगी) आदी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Published on: Nov 24, 2023 05:37 PM