CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या CJP नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परवानगी नसतानाही काही कार्यकर्ते जंतरमंतरपर्यंत पोहोचले आणि त्यांनी तिरंगा फडकवत घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची पुढील भूमिका काय असेल याकडे लक्ष आहे.
दिल्ली पोलिसांनी आज CJP (कॉक्रोच जनता पार्टी) चे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जंतरमंतरकडे जात असताना ताब्यात घेतले. या नेत्यांनी जंतरमंतरवर आंदोलनाची परवानगी मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आली होती. मात्र, आपली भूमिका स्पष्ट करत आंदोलनावर ठाम राहिलेल्या CJP कार्यकर्त्यांनी जंतरमंतरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह १२ ते १५ कार्यकर्ते पोलिसांना चकवा देत जंतरमंतरच्या परिसरात पोहोचले. त्यांनी तिथे तिरंगा झेंडा फडकवून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. या घटनेनंतर दिल्ली पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स आणि सीआरपीएफचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवून अज्ञात स्थळी नेले. या कारवाईनंतरही आशुतोष रांका यांनी ट्विट करत, “मोदीजी, तुम्ही म्हणाला होता की आम्ही जंतरमंतरपर्यंत पोहोचणार नाही, पण कॉक्रोचेस तिथे पोहोचले आहेत,” असे म्हटले आहे.
Published on: Oct 13, 2026 11:07 AM
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?

