CM Uddhav Thackeray | काहींना दिल्ली दरबारी जाऊन उभंच रहावं लागतं, उद्धव ठाकरे यांचा टोला

मला सहकार क्षेत्रातलं खूप काही कळत नाही पण या देशाला सहकाराचा मार्ग हा महाराष्ट्राने दाखवला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना टोले लगावले आहेत.

सहकारतपस्वी स्व. गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र म्हणजे हिम्मत आली, लढवय्येपणं आलं, जिद्द आली. संपूर्ण देशाला दिशा दाखवणारं म्हणजे महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र आहे. मला सहकार क्षेत्रातलं खूप काही कळत नाही पण या देशाला सहकाराचा मार्ग हा महाराष्ट्राने दाखवला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना टोले लगावले आहेत. सहकार क्षेत्र हे काही लेच्यापेच्या सारखं क्षेत्र काम नाही की हे बंद केलं, ते बंद केलं. सहकार क्षेत्राच्या समृद्धीसाठी काम करणं सरकारचं काम आहे. सहकाराची सुधारणा आणि त्याचं वैभव वाढवणं हे काम सरकारचं आहे. तांदळातून जसं खडे वेचून काढावे लागतात तसे काही खडे वेचून काढून सहकाराचा भात आहे, त्याचा सुवास आणि समृद्धी वाढवण्यासाठी महाविकासआघाडी सरकार काम केल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI