महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार नाही, जयश्री थोरात यांची टीका
भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. या प्रकरणात जयश्री थोरात यांनी वसंतराव देशमुख यांच्या वयाचा उल्लेख करीत चांगलाच समाचार घेतला आहे.
महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार नाही अशी टीका कॉंग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात यांनी केली आहे. भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्या खालच्या पातळीवर टीका केली आहे. यामुळे सर्वत्र त्यांच्यावर टीका होत असून कारवाईची मागणी होत आहे. या संदर्भात जयश्री थोरात यांनी वसंतराव देशमुख यांच्या वयाला न शोभणारी भाषा त्यांनी केली असल्याची टीका केली आहे. त्या पुढे म्हणाल्या महिलांना राजकारणात 50 टक्के आरक्षण देण्याची भाषा केली जात आहे. परंतू अशा प्रवृत्ती असतील तर महिलांना का म्हणून राजकारणात यायचे असा सवालही जयश्री थोरात यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशा व्यक्तीला नेमणाऱ्यांची ही खरे तर चूक आहे. मी त्यांच्या मुलीच्या नातीच्या वयाची आहे अशी भाषा वापरुन त्यांनी महिलांचा अपमान केला आहे अशीही टीका जयश्री थोरात यांनी केली आहे.
Published on: Oct 26, 2024 02:38 PM
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार

