गौतमी पाटील सोबतचा ‘तो’ व्हिडीओ वडेट्टीवारांकडून ट्वीट; म्हणाले, भाजप आमदार म्हणजे ‘एक ना धड…’
भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या... असं म्हणत काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या एका आमदाराचा व्हिडीओ टि्वट केला आहे. 'आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार', असेही वडेट्टीवार यांनी म्हटलंय
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालंय पण भाजप आमदारांना याचं काहीच नाही, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. इतकंच नाहीतर भाजप आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील सोबत नाचण्यात व्यस्त असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार यांनी संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटीलसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार यांनी संदीप धुर्वे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे. झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या – शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते. ‘, वडेट्टीवारांच्या या टीकेवर आता संदीप धुर्वे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Published on: Sep 04, 2024 05:40 PM
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
