AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर

Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Dec 03, 2023 | 10:50 AM
Share

भाजपला सध्या ४३ जागा तर काँग्रेसला ४५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. छत्तीसगड राज्यातील ९० जागांच्या विधानसभेमध्ये ४६ जागांचं बहुमत आहे. भाजपला बहुमतासाठी ३ जागांची गरज

मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कौल समोर येत आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. भाजपला सध्या ४३ जागा तर काँग्रेसला ४५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. छत्तीसगड राज्यातील ९० जागांच्या विधानसभेमध्ये ४६ जागांचं बहुमत आहे. तर कलांनुसार काँग्रेसला १ तर भाजपला बहुमतासाठी ३ जागांची गरज असल्याचं दिसतंय. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. छत्तीसगड येथे कॉंग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालात थेट लढत रंगत आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस या मुख्य पक्षात रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Dec 03, 2023 10:50 AM
Follow Us