Pooja Khedkar : खेडकर कुटुंबाचा नवा ‘कार’नामा, पोलिसांच्या अंगावर सोडले कुत्रे अन् ट्रक चालकाचे अपहरण, नेमकं प्रकरण काय?
नवी मुंबईतील ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणात पूजा खेडकर कुटुंब आले आहे. पोलिसांनी पुण्यातील त्यांच्या घरी छापेमारी करून अपहृत चालक प्रल्हाद कुमारला सुटका केली. मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवर कुत्रे सोडल्याचा आरोप आहे. दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात सामील असल्याचा आरोप आहे आणि ते फरार आहेत.
वादग्रस्त आयएएस अधिकारी बडतर्फ पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा एकदा वादात सापडले आहे. नवी मुंबईत घडलेल्या एका अपघातानंतर ट्रक चालक प्रल्हाद कुमार याचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी प्रल्हाद कुमार यांना पुण्यातील दिलीप खेडकरच्या घरी कैदेत ठेवले होते. नवी मुंबई पोलिसांनी पुण्यात छापेमारी करून प्रल्हाद कुमार यांना सुटका केली. यावेळी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवर कुत्रे सोडल्याचा आरोप आहे. दिलीप खेडकर यांवर अपहरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पूजा खेडकरचा मोबाईल जप्त केला आहे आणि मनोरमा खेडकर फरार आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी खेडकर कुटुंबाविरुद्ध आणखी गुन्हे असल्याचा तपास करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचा शोध सुरू आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

