AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSMT Station Big News : रेल्वे प्रवाशांनो महत्त्वाची बातमी... CSMT चा 18 नंबरचा प्लॅटफॉर्म 3 महिने बंद! कारण...

CSMT Station Big News : रेल्वे प्रवाशांनो महत्त्वाची बातमी… CSMT चा 18 नंबरचा प्लॅटफॉर्म 3 महिने बंद! कारण…

| Updated on: Sep 27, 2025 | 1:00 PM
Share

सीएसएमटी स्थानकातील 18 नंबरचा प्लॅटफॉर्म 1 ऑक्टोबरपासून तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. विस्तारीकरण आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा केली जाणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 येत्या 1 ऑक्टोबरपासून पुढील तीन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्मवर महत्वाचे विस्तारीकरण आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे प्रशासनाने म्हटले आहे. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत प्लॅटफॉर्म 18 वर विस्तारीकरण, प्रतीक्षागृह आणि तिकीट काउंटरसह इतर काही भागांची सुधारणा करण्यात येणार आहे.

कामादरम्यान प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी, या प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या सर्व गाड्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून चालवण्यात येणार आहेत. कामाची प्राथमिक तयारी सुरू झाली असून, 1 ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्मवरील रहदारी पूर्णपणे थांबवण्यात येईल. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Sep 27, 2025 10:32 AM